Testimonials



श्री. बबनरावजी ढाकणे

(माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री (भारत सरकार)) Alumnus 1952-1953

इंग्रजांच्या काळात आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेले श्री तिलोक जैन विद्यालय हे तालुक्यातील माध्यमिक शिक्षण देणारे एकमेव विद्यालय . मी या विद्यालयात येण्यापूर्वी अकोले सारख्या दुष्काळी आणि डोंगराळ भागात जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेत चौथी पर्यंत आणि त्यानंतर सातवी पर्यंतचे शिक्षण पाथर्डीत मराठी शाळेत घेतले. हिंद वसतिगृहात राहून पुढे आठवी साठी 1952-53 साली श्री तिलोक जैन विद्यालयात प्रवेश घेतला. आदरणीय मेहंदळे सर आणि निर्मालाताई मेहेंदळे हे उत्तम शिक्षक मला लाभले, ते अतिशय कडक शिस्त असणारे पण प्रभावी शिकवणारे . गोडबोले सर ,भालेराव सर त्या काळी जीव ओतून शिकवणारे .ही त्या काळची तालुक्यातील एकमेव शाळा ,ज्या शाळेत मराठवाडयातील म्हणजे त्यावेळच्या निजाम स्टेट मधील खूप मूल असायची .हिंद वसतिगृहात राहत असल्याने वर्तमानपत्र

Read more...


श्री. सी. डी. फकीर

(माजी मुख्य अभियंता (भारत सरकार ) ) Alumnus 1961-1965

श्री तिलोक जैन विद्यालय ही माझी शाळा, सन 1961 ते 1965 या चार वर्षात आठवी ते अकरावी पर्यंत चे शिक्षण घेत असतांना दररोज प्रभू पिंपरी ते पाथर्डी असा 22 कि.मी. अनवाणी पायी प्रवास आजही आठवतो. पीटीचा बूट जास्त टिकावा म्हणून तो पिशवीत ठेऊन अनवाणी जाणे हे नित्याचेच. चिखलातून चालतांना पायात काटे रुतणे , कालांतराने पायात कुरूप होणे , पावसाळ्यात चिखलात सायकल फसली तर तेथेच सोडून घरी जाणे आणि दुसऱ्या दिवशी सायकल ठीक ठाक करून शाळा गाठणे या सारख्या आठवणीमुळे मला आजही माझी शाळा आठवते . रस्त्यावर चालतांना चिंतनाद्वारे केलेला अभ्यास वेळेचा सदुपयोग शिकवून गेला. त्याकाळी फार पाऊस झाल्याने गावाकडे जाता येत नसे अशा वेळी उर्दू शाळेच्या वरहंड्यात मी राहत असे,अशा वेळी धरमचंद खाबिया माझ्या साठी तांब्यात बोर्डिंग मधून जेवण आणत असत. दरवर्षी 8 ते 11 वी पर्यंत मी शाळेत पहिल्या नंबर ने पास

Read more...


प्रो. के.पी. सोनवणे

(माजी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.) Alumnus 1952-1956

आचार्य सम्राट श्री आंनदऋषीजी यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या श्री तिलोक जैन विद्यालयात मी 1952 ते 1956 साली होतो.ब्रिटिश काळात माध्यमिक शिक्षण देणारी ही तालुक्यातील एकमेव शाळा. सातवी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी मी पाथर्डीला आलो आणि वि. र. बडे वकील यांच्यामुळे हिंद वसतिगृहात राहण्याची सोय झाली. त्यावेळी प.पू. मेहेंदळे मुख्याध्यापक होते. "जसा मुख्याध्यापक तशी शाळा " या उक्तीप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पध्दतीचे शिक्षण या विद्यालयातून मला मिळाले. त्याकाळी थोर स्वा. सेनानी रावसाहेब पटवर्धन ,बाळासाहेब भारदे , कवी यशवंत या सारख्या मान्यवरांच्या भाषणातून आम्हाला प्रेरणा मिळत असे. मेहेंदळे सर रेडिओ वर प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकवत असत. परिसर सहल आणि श्रमदान हे आमच्या साठी पर्वणीच असायची. परीक्षाचे पेपर ऐनवेळी जाहीर केले जात असल्याने वस्तुनिष्ठ मूल्यमापन होत

Read more...


श्री.महेश मुरलीधर भागवत

( I.P.S. Superintendent of Police. Thane Rural District) Alumnus 1978-1984

*श्री तिलोक जैन विद्यालय ( 1978 ते 1984) ते मंतरलेले दिवस* 1923 साली स्थापन झालेल्या या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी आमची दुसरी पिढी. माझे वडील याच शाळेत SSC झाले. माझी मोठी बहीण बारावी पर्यंत आणि तिच्या पाठोपाठ मी व माझ्या दोन लहान बहिणी याच शाळेत शिकलो. 1978 ते 1984 या कालावधीत श्री तिलोक जैन शाळेत पाचवी ते दहावी इयत्तेत होतो. पाचवी शाळेला सुरुवात खालच्या शाळेत झाली. त्यावेळी प. पु. मेहेंदळे सर आणि निर्मला मेहेंदळे बाई मुख्याध्यापक होते. हिंदी विषय चंद्रात्रे सर, चित्रकला बडे सर, महामुनी बाई, मिसाळ बाई, दुकळे बाई, केदार बाई व सर, अकोलकर बाई, हंडाळ सर, कौसे सर, शिंदे सर, नागरे सर, शशी देशमुख सर, भंडारी सर ही शिक्षक मंडळी शिकवायला होती. बडे सरांनी चित्रकलेची छानच गोडी लावली त्यामुळे सहावीत असताना महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत पारितोषिक मिळाले आणि अहमदनगर

Read more...


डॉ. शिवाजी राठोड

( I.P.S. Superintendent of Police. Thane Rural District) Alumnus 1985-1986

श्री तिलोक जैन विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. सन 1985-86 साली मी या विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालो. मी सन 1993 मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय,परळ येथून बी. व्ही. एस. सी. अँड ए. एस. ही पदवी उत्तीर्ण झालो. सन 1993 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या live stock development officer वर्ग 2 या पदावर निवड होऊन नाशिक जिल्ह्यात Veterinary Doctor म्हणून दोन वर्षे सेवा केली , त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा पोलिस उपअधीक्षक या पदावर निवड झाल्याने सन1996 पासून महाराष्ट्र पोलीस दलात नांदेड , ठाणे , लातूर अशा ठिकाणी कार्य केले आहे .सध्या ठाणे (ग्रामीण) येथे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. माझ्या यशाच्या जडणघडणीचा पाया हा श्री तिलोक जैन विद्यालयात मध्ये रचला गेला. विद्यालयाच्या शिस्तबद्ध पद्धतीने घेतलेल्या स्पर्धा, एन. सी.सी. याचा माझ्या यशात मोठा

Read more...


Kunal Gugale

(Software Engineer at Dataminr Inc, New York.) Alumnus NA

श्री तिलोक जैन विद्यालय - माझी शाळा! आज मी जे काही आहे, त्यात सर्वाधिक योगदान आहे ते शाळेचं. आयुष्यातील प्रत्येक अवघड परीक्षा, निर्णय यांसाठी मला तयार केले ते शाळेने; जिवाभावाची मैत्री दिली ती शाळेने. गुरुजनांचा आदर्श आणि मार्गदर्शन यांवर आजवरचा प्रवास झाला, आणि पुढेही तेच माझे दीपस्तंभ राहतील ही खात्री आहे.

Read more...


डॉ. भक्ती विलास बाहेती

((इलेक्ट्रॉनिक्स PhD)) Alumnus 2001-2007

मी भक्ती विलास बाहेती, श्री तिलोक जैन विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत (२००१-२००७) विद्यार्थिनी होते. माझे वडील, तीन मोठ्या बहिणी सर्व याच शाळेत शिकले. सध्या मी इलेक्ट्रॉनिक्स विषयात PhD पूर्ण केली असून विद्यापीठात शोधनिबंध सादर केला आहे. आज आणि भविष्यात मी जे काही मिळवले आहे त्यात या शाळेचा अमूल्य वाटा आहे हे मी अभिमानाने सांगते. दहावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे ११ वी ला पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यानंतर २०१३ मध्ये पुण्यातील PICT कॉलेज मधून इंजिनीअरिंग आणि २०१५ मध्ये SGGS नांदेड येथून पदव्युत्तर शिक्षण M.Tech पूर्ण केले आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयात PhD संशोधनास सुरुवात केली. PhD मध्ये विविध प्रतिष्ठित journals आणि conferences मध्ये माझे शोध निबंध प्रकाशित झाले तसेच विविध travel grant आणि fellowship ची मी मानकरी ठरले. मागील

Read more...


डॉ. अमिता ललित गुगळे

(MBBS) Alumnus 2005-2010

नमस्कार! मी MBBS पूर्ण करून मी सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MD Radiology चा अभ्यास करत आहे. मी श्री तिलोक जैन विद्यालयात इ. ५वी ते इ. १०वी पर्यंत चे शिक्षण २००५-२०१० च्या दरम्यान घेतले. त्यानंतर मी उच्च माध्यमिक शिक्षण पुणे येथे घेतले व NEET UG परीक्षेमधून (State Rank २४६) माझी B.J. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे MBBS करण्यासाठी निवड झाली. पाथर्डी सारख्या छोट्या गावातून इथपर्यंतचा माझा प्रवास नक्कीच रोमांचक राहिला आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण आपल्या बालपणी होते व माझा हाच पाया माझ्या शाळेने खंबीर रचला असे मला वाटते. चांगले माध्यमिक शिक्षण हा आपल्या करिअरचा पाया आहे. मी त्यासाठी STJVP मध्ये होते यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. या शाळेत मला विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत झटणारे, त्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधणारे गुरुजन मिळाले.

Read more...


श्री रोहित रावसाहेब मोरे

(VRDE जाॅईंट डायरेक्टर ) Alumnus 1992-1997

श्री तिलोक जैन विद्यालय येथे 1992 ते 1997 या कालावधीमध्ये बारावी सायन्स पर्यंत चे शिक्षण घेतले. सध्या मी VRDE म्हणजेच वाहन अनुसंधान, अहमदनगर येथे जाॅईंट डायरेक्टर या केंद्र सरकारी क्लास वन पदावर काम करत आहे. मी 2001 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून मेकॅनिकल इंजीनियरिंग मध्ये गोल्ड मेडलसह उत्तीर्ण झालो व 2004 मध्ये आय आय टी खरगपूर, कोलकाता येथून एरोस्पेस या विषयात संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाने M Tech पास झालो, त्यामुळे मला भारत सरकारने कोणत्याही प्रवेश प्रक्रिये शिवाय डायरेक्ट नोकरीत रूजू करून घेतले. आपल्या या विद्यालयाचा माझ्या जडण घडणीमध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. इ. 8 वी पासून असणाऱ्या टेक्नीकल विषयामुळे माझा टेक्नीकल दृष्टीकोन तयार होत गेला व मला त्याविषयी आवड निर्माण झाली. अकरावी, बारावी सायन्स मध्ये व्होकेशनल कोर्स मुळे पुढे

Read more...


Vishnu Shirsat

(Fighter Pilot - INDIAN AIR FORCE) Alumnus 2002

I joined school in june 2002 at 6th class. It was change of everything for me as i previously attended zila parishad school. STJV gave me everything that a young mind would want, quality education, exposure to state level exams, stage confidence, exposure to state level sports, basic earning skills in the form of technical knowledge at V3,V2 subjects and what not. The teachers took extra interest at students. Simply saying STJVP was class apart and i feel that there can hardly be any comparison to such an allround organisation in state considering the rural roots of STJVP. I am currently serving in INDIAN AIR FORCE as a fighter pilot, and flown Kiran mk1, Hawk mk132, MiG27, Pilatus PC7 aircraft of Air force. As on today i am a Flying Instructor at an air force training establishment at Hyderabad. Once again please consider my sincere apologies sir. Jaihind!

Read more...


धीरज गुगळे

(डेप्युटी कॅन्ट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट,मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स,पुणे ) Alumnus 2001

शाळा म्हणजे जीवनाला दिशा देणारा एक महागुरु ,विद्येचे माहेरघर आणि शाळेतील सर्व गुरुजन म्हणजे मार्गदर्शक दीपस्तंभ. या सर्वांच्या जडणघडणीतून पाथर्डी मधील श्री तिलोक जैन विद्यालयात पाचवी ते दहावी चे शिक्षण घेत,मिळालेल्या आदर्श संस्कारांच्या बळावर आज मला आयुष्यात मोठे यश लाभले आहे.आई वडील हे आपले प्रथम गुरू तर शाळा तेथील शिक्षक वृंद हे दुसरे गुरू.शाळेमुळे आपले आयुष्य घडत असते. या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज बीई,मॅकेनिकल इंजिनीअरिंग,बिट्स,पिलानी चे उच्च शिक्षण घेत व यूपीएससी सारखी क्लिष्ठ परीक्षा उत्तीर्ण होत मला भारतीय लष्करी सेवेत आयडीएएस अधिकारी पदापर्यंत मजल गाठता आली. शाळेत असताना मी शिक्षकांना नेहमी विज्ञान व गणिताबद्दलचे अभ्यासक्रमातील असो किंवा अभ्यासक्रमा बाहेरचे असो असंख्य प्रश्न विचारायचो आणि शिक्षकही माझ्या या प्रश्नांना

Read more...


महादेव विश्वनाथ गोसावी

(माजी शिक्षण उपसंचालक, पुणे) Alumnus 1972

मी महादेव विश्वनाथ गोसावी माजी शिक्षण उपसंचालक पुणे. अभिमान वाटावा अशी माझी श्री तिलोक जैन विद्यालय ही शाळा. या शाळेतून मी 1972 साली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालो. अहमदनगर महाविद्यालयातून पदवी घेतली व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात 1983 साली हजर झालो. सेवेच्या 29 वर्षाच्या कालखंडात उपशिक्षणाधिकारी , शिक्षणाधिकारी , सहा. आयुक्त ,सहा. शिक्षण उपसंचालक , शिक्षण उपसंचालक अशा विविध प्रशासकीय पदावर काम करून 2012 साली विभागीय सचिव महा. राज्य माध्य व उच्च माध्य. शिक्षण मंडळ पुणे या पदावरून सेवानिवृत्त झालो आहे. माझ्या आयुष्यात माझ्या शाळेचे योगदान महत्त्वाचे आहे.मला मा.मेहेंदळे सर ,उरणकर सर आणि मेघुंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. मी या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला

Read more...


Dr. Sandeep Ramkisan Shinde

(MBBS, DMRD, DNB, Globus Diagnostic centre Ahmednagar) Alumnus 1995

आपले आई वडील आपले जन्मदाते असतात व कधीच आपल्याला विसरू शकत नाहीत. तद्वतच माझी शाळा मला स्मरणात ठेवते आहे हे अनुभवून खरंच माझा ऊर अभिमानाने भरून येतो. आई वडिलांनी जीवन दिले.. मात्र या जीवनाला खरा आकार मिळाला तो या श्री तिलोक जैन विद्यालयात. मला घडवण्यात जितका वाटा माझ्या आई वडिलांचा आहे तितकाच या विद्यालयाचा आहे. शालेय जीवनाचा काळ म्हणजे आपले जगणे व मरणे या मधील अंतर कसे असेल हे ठरवणारा काळ असतो. आणि माझ्या या काळाला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली ती श्री तिलोक जैन विद्यालयामुळे. तिथंच माझ्या करिअरची शैक्षणिक व सामाजिक पाळेमुळे घट्ट झाली म्हणुनच माझ्या आयुष्यात मी भक्कमपणे आपणासमोर उभा आहे व वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे. मी 1995 साली या विद्यालयातून 90.42% मिळवून SSC मध्ये तालुक्यात पहिला आलो. HSC मध्येही मी तालुक्यात पहिला आलो.. अर्थातच यामध्ये मला शिकवणारे

Read more...

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.