विद्यालयामध्ये ध्यानधारणा, प्राणायाम , विपश्यना ( आनापान )
यांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था केलेली आहे.
जेव्हा मन चंचलतेपासून मुक्त होऊन शांत, स्थिर होते तेव्हा
ध्यान लागते.
ध्यानाचे लाभ
ध्यानाचे अनेक लाभ आहेत. मानसिक स्वच्छतेसाठी याची नितांत
आवश्यकता आहे.
१) शांत मन
२) उत्तम एकाग्रता
३) चांगला संवाद
४) आकलनशक्ती मध्ये स्पष्टता
५) सृजनशीलता आणि कुशलतेचा विकास
६) अचल आंतरिक शक्ती
७) उपचार , स्वास्थ्य
८) ऊर्जा स्रोताशी संधान
९) विश्राम ,ताजेतवाने होणे.
१०) सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.
प्राणायाम
उत्तम आरोग्यासाठी प्राणायाम उपयुक्त असतो.
प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम या दोन शब्दांपासून तयार
झाला आहे. प्राण म्हणजे ऑक्सिजन आणि आयाम म्हणजे घेणे. शरीरात
ऑक्सिजन घेणे म्हणजे प्राणायाम. विशिष्ट पद्धतीने घेतलेला श्वास
आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.
विपश्यना (आनापान)
विपश्यना शब्दाचा अर्थ असा की, जी वस्तू खरोखरच जशी आहे, ती
त्याच प्रकारे जाणून घेणे.
प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ह्या सत्याची अनुभूती ही एक शुद्धीकरणाची
प्रक्रिया आहे.
विद्यालयांमध्ये ध्यानधारणा, प्राणायाम, विपश्यना (आनापान)
यांचे शास्रोक्त प्रशिक्षित शिक्षकांमार्फत मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र
हॉलची निर्मिती केलेली आहे.