Testimonials



डॉ. शिवाजी राठोड

( I.P.S. Superintendent of Police. Thane Rural District) Alumnus 1985-1986

श्री तिलोक जैन विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. सन 1985-86 साली मी या विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालो. मी सन 1993 मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय,परळ येथून बी. व्ही. एस. सी. अँड ए. एस. ही पदवी उत्तीर्ण झालो. सन 1993 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या live stock development officer वर्ग 2 या पदावर निवड होऊन नाशिक जिल्ह्यात Veterinary Doctor म्हणून दोन वर्षे सेवा केली , त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा पोलिस उपअधीक्षक या पदावर निवड झाल्याने सन1996 पासून महाराष्ट्र पोलीस दलात नांदेड , ठाणे , लातूर अशा ठिकाणी कार्य केले आहे .सध्या ठाणे (ग्रामीण) येथे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. माझ्या यशाच्या जडणघडणीचा पाया हा श्री तिलोक जैन विद्यालयात मध्ये रचला गेला. विद्यालयाच्या शिस्तबद्ध पद्धतीने घेतलेल्या स्पर्धा, एन. सी.सी. याचा माझ्या यशात मोठा वाटा आहे असे मी मानतो. माझ्या यशात सर्व शिक्षकांचे योगदान खूपच महत्त्वाचे आहे विशेषत: श्री देशमुख सर , श्री खाबिया सर आणि कोळेकर सर यांचा मी विशेष आभारी आहे.

Back to Testimonials

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.