"मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"
या उक्तीनुसार मन प्रसन्न असेल तर सर्व बाबी प्राप्त होतात. मन प्रसन्न करायचे असेल; तर सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे व्यायाम,योगा, प्राणायाम, खेळ इत्यादी होय.
या सर्वात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यालयात या अनुषंगाने विविध क्रीडा प्रकाराला प्रामुख्याने महत्त्व दिले जाते. सतरा एकराचा विस्तीर्ण परिसर विद्यालयाचा आहे.
यामध्ये ४०० मी ट्रक हॉलीबॉलची दोन मैदाने, खो खो ची दोन मैदाने, कबड्डीची तीन मैदाने, लांब उडी, गोळाफेक ,थाळीफेक इत्यादी विविध प्रकारची भव्य व प्रशस्त मैदाने
असून सकाळ,संध्याकाळ खेळाडूंचा सराव घेतला जातो.विद्यालयाला क्रीडाक्षेत्रात गौरवशाली यशाची परंपरा लाभलेली असून आजपर्यंत विद्यालयाने रोप स्किपिंग प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तर,
कुस्ती राज्यस्तर, वेटलिफ्टिंग राज्यस्तर, हॉलीबॉल राज्यस्तर, बुद्धिबळ विभाग स्तर अशा प्रकारचे नेत्रदीपक प्रावीण्य प्राप्त केलेले आहे.
याशिवाय विविध मैदानी स्पर्धा उदाहरणार्थ ४०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी,गोळा फेक,थाळी फेक,भाला फेक इत्यादी क्रीडा प्रकारात देखील विद्यार्थ्यांनी
राज्यस्तरावर प्रावीण्य प्राप्त केलेले आहे.
क्रीडा विभागात श्री भंडारी ए.बी., श्री शिरसाट ए.डी., कर्णावट व्ही.जी. कामकाज पाहतात.
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.