श्री आदर्श विद्यार्थीनगर पाथर्डी या वसतीगृहाची स्थापना जून १९७० साली झाली. शाळेचे शैक्षणिक महत्त्व विचारात घेता या वसतीगृहाची निर्मिती झाली. वसतीगृहाला प्रथम मान्यता स्थानिक लोकल बोर्डाची होती. सुरुवातीला २० मुलांवर या वसतीगृहाची निर्मिती झाली. कालांतराने वसतीगृह शासनाकडे १९७२ साली वर्ग करण्यात आले. त्यावेळी २४ मुलांची मान्यता मिळाली. शासकीय अधीक्षक म्हणून श्री मुनोत सर यांची नियुक्ती झाली. ५ वर्षांनंतर वसतीगृहात तब्बल ६० मुले झाली. त्या नंतर एकाच वर्षात ही मान्यता ७२ वर पोहचली. वसतीगृहातून आत्ता पर्यंत भरपूर मुले शिकली; आणि मोठमोठ्या हुद्द्यावर नोकरी करत आहेत. आज रोजी वसतीगृहाचे रूपांतर हे वटवृक्षासारखे झाले आहे. सध्या या वसतीगृहाचे कामकाज श्री पारखे सर हे सन २००७ पासून पाहतात. वसतीगृहात दर्जेदार आहार मिळत आहे. वसतीगृहात मागसवर्गीय ,अनाथ, आर्थिक परिस्थिती नसणारे मुले शिक्षण घेत आहेत.
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ , संचालित जैन छात्रालयाची स्थापना १९२३ मध्ये झाली. अवघ्या सहा विद्यार्थ्यांवर हे जैन छात्रालय सुरू झाले. छात्रालयातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची , राहण्याची आणि जेवणाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्ती करतात . विद्यार्थी स्वावलंबी व सुसंस्कारी व्हावेत ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या शिक्षणाची सोय होऊन भविष्यात ते संस्थेचे आधारस्तंभ व्हावेत; म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे या छात्रालयातून बुद्धिमान, सुसंस्कृत, धर्मशील, गुणवान, चारित्र्यशील विद्यार्थी तयार झाले. आजही पाथर्डीतील जैन छात्रालयाचा महाराष्ट्रातील समाजात मोठा लौकिक आहे. आज या छात्रालयाचे स्वरूप विशाल झालेले आहे.संस्थेने सुंदर अशी इमारत होस्टेल साठी बांधलेली आहे. इयत्ता पाचवी पासून ते डी.फार्मसी पर्यंतची सर्व मुले या छात्रालयामध्ये राहतात. छात्रालयात आज रोजी ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.