मी महादेव विश्वनाथ गोसावी माजी शिक्षण उपसंचालक पुणे. अभिमान वाटावा अशी माझी श्री तिलोक जैन विद्यालय ही शाळा. या शाळेतून मी 1972 साली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालो. अहमदनगर महाविद्यालयातून पदवी घेतली व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात 1983 साली हजर झालो. सेवेच्या 29 वर्षाच्या कालखंडात उपशिक्षणाधिकारी , शिक्षणाधिकारी , सहा. आयुक्त ,सहा. शिक्षण उपसंचालक , शिक्षण उपसंचालक अशा विविध प्रशासकीय पदावर काम करून 2012 साली विभागीय सचिव महा. राज्य माध्य व उच्च माध्य. शिक्षण मंडळ पुणे या पदावरून सेवानिवृत्त झालो आहे. माझ्या आयुष्यात माझ्या शाळेचे योगदान महत्त्वाचे आहे.मला मा.मेहेंदळे सर ,उरणकर सर आणि मेघुंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. मी या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. धन्यवाद.
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.