राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील अनेक स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी CET , NEET, JEE या सारख्या परीक्षांची तयारी व इ. १२ वी नंतरची प्रवेश प्रक्रिया यांचे मोफत मार्गदर्शन विद्यालयात केले जाते. परीक्षेसाठी लागणारी पुस्तके विद्यालयाच्या ग्रंथालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहेत. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील परीक्षांचा अभ्यास व मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र सुसज्ज व प्रशस्त हॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी विद्यालयामध्ये NTS, MTS , इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या परीक्षेचे आयोजन केले जाते. स्पर्धा परीक्षा जिंकण्यासाठी विद्यार्थ्याकडे चिकाटी, जिद्द, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम हे गुण महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्यांना या सर्व गुणांची माहिती सांगून वेगवेगळ्या विषयांचे मार्गदर्शन केले जाते . स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना त्यांचा अभ्यासक्रम या बाबत माहिती दिली जाते. गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता, विज्ञान, समाजशास्त्र, चालू घडामोडी या विषयांची तयारी करून घेतली जाते. भविष्यामध्ये करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना प्रधान्य देण्याची मानसिकता या विद्यार्थ्यांमध्ये तज्ञांमार्फत वाढविली जाते.
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.