Environment


स्वच्छ शालेय परिसर व पर्यावरण

      "स्वच्छता "शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारुपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास मोलाचे काम शाळा करते. समृद्ध शाळेच्या निर्माणमध्ये पहिले महत्त्वाचे पाऊल हे स्वच्छतेचे आहे. यासाठी आपण स्वतः बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्त्वाचे आहे."Cleanliness is next to Godliness" या महात्मा गांधीजीच्या घोषवाक्यानुसार माननीय सचिव श्री सतीशजी गुगळे यांनी स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन स्वच्छ व सुंदर शाळेची घोषणा केली. शालेय परिसर हा देवालयाच्या परिसरासारखा सुंदर व स्वच्छ असावा. आपण अन्नाशिवाय एखादा दिवस, पाण्यावाचून एखादा तास जिवंत राहू शकतो;मात्र हवेतील ऑक्सिजन शिवाय क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाहीत. ऑक्सिजन निर्मितीचे सर्वात मोठे कार्य परिसरातील वृक्ष करीत असतात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात; आणि हवेतील कार्बन डाय- ऑक्साईड शोषून मानवास उपयुक्त अशी शुद्ध हवा सोडतात. त्यामुळे वनस्पती व वृक्षांची लागवड व संवर्धन करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. संत तुकाराम महाराज या विषयी म्हणतात की," वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे! पक्षी ही सुस्वरे आळविती!" खरंच वृक्ष हे आपले सगेसोयरे नातलग, मित्र परिवारातीलच आहेत. म्हणून त्यांचे संगोपन पालनपोषण हे लहान मुलांसारखे केले पाहिजे.

    मानवाचा सर्वांगीण विकास करणे तसेच नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर करून सामाजिक विषमता दूर करणे हे उद्दिष्ट अभिप्रेत आहे. त्याचबरोबर मानवाच्या अविचारी कृतीवर नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय समस्यांच्या निवारणासाठी निर्धारित केलेली तत्त्वे यांचा पर्यावरण व्यवस्थापनात समावेश होतो. मानवाच्या सामाजिक विकासाबरोबर पर्यावरणाची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यावरण हे मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यालयांमध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वतःहून शिक्षकांनी व शिपाई कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. यामध्ये शिक्षक श्री शिरसाट ए.डी , श्री कुळधरण व्ही.आर , श्री गांगुर्डे बी. बी, श्री पठाण जे. जी, श्री पानखडे ए.पी, श्री उदागे सी.डी श्री सुकदेव गोसावी, श्री अनिल जाधव, श्री किशोर पालवे, श्री गणेश बटुळे, या सर्वांनी उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.




Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.