श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयास गौरवशाली परंपरा लाभलेली आहे . आजपर्यंत विद्यालयास अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत . यात प्रामुख्याने पाथर्डी नगरपरिषद ,पाथर्डी यांच्या वतीने स्वच्छ शाळा – सुंदर शाळा पुरस्कार , स्व . राजीवजी राजळे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित महाआरोग्य शिबिरास उत्कृष्ट सहकार्याबद्दल स्व . राजीवजी राजळे स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. शाळा सिद्धी मानांकामध्ये प्रतिवर्षी ‘ अ ’ श्रेणी प्राप्त . क्रीडा स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद संशोधन प्रकल्प राष्ट्रीय स्तर, इंन्स्पायर अवार्ड राज्यस्तर, विज्ञान प्रदर्शन राष्ट्रीय स्तर यासह एन.सी.सी. दिल्ली परेड मध्ये सहभागी होण्याची संधी, गर्ल गाईड युनिटचा मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते विशेष पुरस्कार देवून सन्मान इ.अनेक संस्मरणीय व गौरवशाली पुरस्कार विद्यालयास प्राप्त झालेले आहेत . शाळेचे कामकाज पाहण्यासाठी विद्यालये भेटी देत असून विद्यालयाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे .
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.