Testimonials



Dr. Sandeep Ramkisan Shinde

(MBBS, DMRD, DNB, Globus Diagnostic centre Ahmednagar) Alumnus 1995

आपले आई वडील आपले जन्मदाते असतात व कधीच आपल्याला विसरू शकत नाहीत. तद्वतच माझी शाळा मला स्मरणात ठेवते आहे हे अनुभवून खरंच माझा ऊर अभिमानाने भरून येतो. आई वडिलांनी जीवन दिले.. मात्र या जीवनाला खरा आकार मिळाला तो या श्री तिलोक जैन विद्यालयात. मला घडवण्यात जितका वाटा माझ्या आई वडिलांचा आहे तितकाच या विद्यालयाचा आहे. शालेय जीवनाचा काळ म्हणजे आपले जगणे व मरणे या मधील अंतर कसे असेल हे ठरवणारा काळ असतो. आणि माझ्या या काळाला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली ती श्री तिलोक जैन विद्यालयामुळे. तिथंच माझ्या करिअरची शैक्षणिक व सामाजिक पाळेमुळे घट्ट झाली म्हणुनच माझ्या आयुष्यात मी भक्कमपणे आपणासमोर उभा आहे व वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे. मी 1995 साली या विद्यालयातून 90.42% मिळवून SSC मध्ये तालुक्यात पहिला आलो. HSC मध्येही मी तालुक्यात पहिला आलो.. अर्थातच यामध्ये मला शिकवणारे गुरुजनांचा सिंहाचा वाटा आहे.. मेरिटच्या आधारे मला MBBS साठी लोकमान्य टिळक म्युनिसिपल काॅलेज, सायन मुंबई येथे प्रवेश मिळाला. तेथे यशस्वी पणे मी MBBS पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी मला मेरिटच्या आधारेच DMRDसाठी टाटा हॉस्पिटल येथे मिळाले. लिलावती हॉस्पिटल मधे DNB मध्ये मी मेरीट मध्ये दुसरा आलो. यानंतर JUPITER DIAGNOSTIC CENTER MUMBAI व ASIAN HEART HOSPITAL MUMBAI या नामांकित हाॅस्पिटल मधे मी वैद्यकीय व्यावसायीक अनुभव घेतला आहे. आज मी आपणा सर्वांच्या आशीर्वादाने GLOBUS DIAGNOSTIC CENTER हे वैद्यकीय युनिट अहमदनगर मध्ये चालवत आहे. मोठ्या शहरांमध्ये खरंतर उन्नती साठी जास्त वाव असतो. पण आपण ज्या मातीत घडलो वाढलो, त्या आपल्या माणसांची सेवा करण्याची मला संधी मिळावी म्हणून मी अहमदनगर मध्ये वैद्यकीय सेवा करण्याचा निर्णय घेतला. मागं वळून पाहिलं की सोनेरी क्षण नेहमीच आठवत असतात आणि बहुतेक ते क्षण हे शालेय जीवनातील असतात.

Back to Testimonials

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.