माध्यमिक विभाग


      गंगा नदी ही एक विशाल जीवनदायिनी नदी आहे. ती ज्या परिसरातून वाहते तो परिसर, तेथील जीवन समृद्ध होते . ज्ञानाचे ही तसेच आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला श्री तिलोक जैन विद्यालयातील ज्ञानाचा स्पर्श झाला. त्यांचे आयुष्य समृद्ध, प्रगत झाले.       श्री तिलोक जैन विद्यालयातील माध्यमिक विभाग म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनातील 'टर्निंग पॉईंट'  आहे.  या विभागाचे कामकाज सकाळी सुमधुर प्रार्थनेने होते. प्रार्थना  मन प्रसन्न, आनंद व उत्साह देणारी असते . या विभागामध्ये इयत्ता ९ वी. व १० वी च्या प्रत्येकी पाच तुकड्या आहेत. यापैकी ब,क,ड ,इ या सेमी माध्यमाच्या तर अ तुकडी मराठी माध्यमाची आहे. या वर्गांना मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान हे चार विषय सक्तीचे तर संस्कृत संपूर्ण / हिंदी संस्कृत (संयुक्त ) सामाजिक शास्त्रे / तंत्र (मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स) यापैकी दोन असे एकूण सहा विषय असतात. इ. ९ वी व इ. १०वी साठी सुसज्ज प्रयोगशाळामधून विज्ञान, संगणक ,तंत्र या विषयाचे कृतियुक्त व कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जाते. 

         डॉ. सी. व्ही रमण, MTS , NTS, जिल्हा गणित विज्ञान स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , गणित विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, NCC, गर्ल गाईड / स्काऊट / क्रीडा स्पर्धा ,योगा प्राणायाम, ध्यानधारणा यासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाते.  झाडांची देखभाल,परिसर स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, मुलींसाठी विशेष मार्गदर्शन, ग्रंथालय व पुस्तक परिचय , फूड फेस्टिवल विज्ञान जत्रा, मराठी भाषा दिन, विज्ञान दिन, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन असे उपक्रम उत्साहात राबवले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो.     विद्यालयाचा नियोजनबद्ध "श्री आनंद पॅटर्न "हा गुणवत्ता वाढविणारा पॅटर्न राबविला जातो. विषय शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडून घेणे असा हा उपक्रम राबवला जातो. त्याचे फळ म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ.       दहावी बोर्ड परीक्षा निकालाची उत्कृष्ट परंपरा या विभागाने जोपासली आहे. पैकीच्या पैकी( आऊट ऑफ ) गुण घेणारे विद्यार्थी या विद्यालयातील आहेत.




Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.