तंत्र विभाग


      पाथर्डी तालुका हा ग्रामीण, डोंगराळ भाग असल्यामुळे दळणवळणाची सुविधा नव्हती. पर्यायाने रोजगार ही उपलब्ध नव्हते. रोजगार निर्मिती ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देणे व एखाद्या व्यवसायात प्रगती करून त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचविणे. यासाठी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळातील संचालकांनी दि. १६/०४/१९६२ मध्ये तंत्र शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली.  त्या काळात महाराष्ट्रात तांत्रिक शिक्षणाची सोय फक्त काही ठराविक संस्थेमध्येच उपलब्ध होती. त्यामुळे दूरदृष्टी असलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तांत्रिक  शिक्षणातून नवनिर्मिती करून रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने सदर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. टर्निंग, फिटिंग, वेल्डिंग, मोल्डिंग इ. विषयांच्या मशिनरी साठी निधी उभा करणे, सदर शिक्षण देण्यासाठी उच्चशिक्षित व अनुभवी निदेशकांची नियुक्ती करणे हे काम अत्यंत जिकिरीचे असून देखील आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंद ऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने पूर्ण झाले. त्या काळातील सर्व सोयींनी युक्त कार्यशाळा, इंजीनियरिंग ड्रॉईंग हॉल ,सर्व आधुनिक मशिनरी आजही कार्यरत आहेत.  पूर्वी विजेची समस्या असल्यामुळे  त्याकाळी किर्लोस्कर कंपनीने थ्री फेज विद्युत जनरेटर उपलब्ध करून दिला. तो आजही या ठिकाणी सुस्थितीत आहे .आज विद्यालयात इ. ९ वी ते इ.१२ वी तंत्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये इ. ९ वी आणि इ. १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विषयांतर्गत फिटिंग, वेल्डिंग, कारपेंटिंग, शिटमेटल , टर्निंग ,मशीन ड्राईंग ऑटो कॅड इ. विषयाचे अध्यापन केले जाते. तसेच विद्यालयात मुलींसाठी देखील तंत्र शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचे अध्यापन केले जाते. इ. ११ वी व इ. १२ वी साठी देखील मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स या द्विलक्षी अभ्यासक्रम शिकवला जातो .सदर शिक्षण देणारे हे विद्यालय महाराष्ट्रातील एक नामांकित विद्यालय असून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी परजिल्ह्यातून सुद्धा विद्यार्थी येतात .आजपर्यंत या विद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतःचे कारखाने उभारून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिवाय अनेक विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत .आज या ठिकाणी इ.९ वी ते इ.१२ वी पर्यंत प्रतिवर्षी ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी तंत्रशिक्षणाचे धडे घेत असून त्यासाठी  उच्च विद्याविभूषित सेवक वृंद कार्यरत आहे.




Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.