विद्यालयाचे ग्रंथालय जिल्ह्यातील शालेय स्तरावर अग्रगण्य व तालुकास्तरावर सर्वात मोठे सुसज्ज व भव्य ग्रंथालय आहे .सन १९६५ पासून ग्रंथालयात ग्रंथ वर्गीकरण पद्धतीनुसार ग्रंथालयात कथा, कादंबरी, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, संदर्भग्रंथ, जनरल नॉलेज, बालसाहित्य, क्रीडा, पाकशास्त्र, ऐतिहासिक, भौगोलिक, इत्यादी विविध प्रकारचे दुर्मीळ जुने ग्रंथ संपदा ग्रंथालयात आहेत. बारा हजार ग्रंथसंपदा वर्गीकृत केलेले असून दरवर्षी तीन हजार विद्यार्थी ग्रंथालयाचा लाभ घेतात. ग्रंथालयात विविध प्रकारचे 10 मासिके,८ वृतपत्रे, 1000 संदर्भग्रंथ व शैक्षणिक मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतील संदर्भ पुस्तकांचा विद्यार्थ्यांना उपयोग होतो. मराठी विश्वकोश, इंग्रजी विश्वकोश ,सायन्स विश्वकोश ऐतिहासिक व भौगोलिक विश्वकोश, धार्मिक दुर्मीळ विश्वकोश , विविध भाषेतील शब्दकोश ग्रंथालयात उपलब्ध आहेत. दरवर्षी विद्यालयात पुष्कळ वेगवेगळया प्रकारची पुस्तके खरेदी केली जातात.ग्रंथालय हे वर्धिष्णू आहे.
इयत्ता पाचवी ते आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत दरवर्षी क्रमिक पुस्तके मोफत वाटप होतात. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पुस्तके ग्रंथालय कार्डवर आठ दिवसांसाठी दिली जातात. विद्यार्थी व शिक्षक हे केंद्रबिंदू मानून ग्रंथालयातून विविध ग्रंथांचे वाटप केले जाते. ग्रंथालय ज्ञानमंदिर असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारीवृंद ग्रंथालयाचा लाभ घेतात. इ. ११वी व इ. १२वी विद्यार्थ्यांसाठी सीईटी, जेईई, नीटसाठी नामांकित विविध प्रकाशनांचे पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. आज पर्यंत वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील स्पर्धा पुस्तकांचा वापर केलेला आहे.
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.