श्री तिलोक जैन विद्यालय येथे 1992 ते 1997 या कालावधीमध्ये बारावी सायन्स पर्यंत चे शिक्षण घेतले. सध्या मी VRDE म्हणजेच वाहन अनुसंधान, अहमदनगर येथे जाॅईंट डायरेक्टर या केंद्र सरकारी क्लास वन पदावर काम करत आहे. मी 2001 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून मेकॅनिकल इंजीनियरिंग मध्ये गोल्ड मेडलसह उत्तीर्ण झालो व 2004 मध्ये आय आय टी खरगपूर, कोलकाता येथून एरोस्पेस या विषयात संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाने M Tech पास झालो, त्यामुळे मला भारत सरकारने कोणत्याही प्रवेश प्रक्रिये शिवाय डायरेक्ट नोकरीत रूजू करून घेतले. आपल्या या विद्यालयाचा माझ्या जडण घडणीमध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. इ. 8 वी पासून असणाऱ्या टेक्नीकल विषयामुळे माझा टेक्नीकल दृष्टीकोन तयार होत गेला व मला त्याविषयी आवड निर्माण झाली. अकरावी, बारावी सायन्स मध्ये व्होकेशनल कोर्स मुळे पुढे ईंजिनीयरींग ला जाणे सोपे झाले आणि मला माझ्या आवडत्या विषयात करिअर करणे सोपे गेले. माझ्या या यशात आपल्या विद्यालयातील सर्वच शिक्षकांचा वाटा आहे, तरीही श्री व्ही के देशमुख सर, श्री कस्तुरे सर, व माझे वडील श्री मोरे सर यांचा मी विशेष आभारी आहे. धन्यवाद !
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.