*श्री तिलोक जैन विद्यालय ( 1978 ते 1984) ते मंतरलेले दिवस* 1923 साली स्थापन झालेल्या या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी आमची दुसरी पिढी. माझे वडील याच शाळेत SSC झाले. माझी मोठी बहीण बारावी पर्यंत आणि तिच्या पाठोपाठ मी व माझ्या दोन लहान बहिणी याच शाळेत शिकलो. 1978 ते 1984 या कालावधीत श्री तिलोक जैन शाळेत पाचवी ते दहावी इयत्तेत होतो. पाचवी शाळेला सुरुवात खालच्या शाळेत झाली. त्यावेळी प. पु. मेहेंदळे सर आणि निर्मला मेहेंदळे बाई मुख्याध्यापक होते. हिंदी विषय चंद्रात्रे सर, चित्रकला बडे सर, महामुनी बाई, मिसाळ बाई, दुकळे बाई, केदार बाई व सर, अकोलकर बाई, हंडाळ सर, कौसे सर, शिंदे सर, नागरे सर, शशी देशमुख सर, भंडारी सर ही शिक्षक मंडळी शिकवायला होती. बडे सरांनी चित्रकलेची छानच गोडी लावली त्यामुळे सहावीत असताना महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत पारितोषिक मिळाले आणि अहमदनगर च्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेत बक्षीस वितरण झाले. एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी, 3 ऑगस्ट स्वर्गीय मोतीलालजी गुगळे पुण्यतिथी निमित्ताने पारितोषिक वितरण तसेच धामणगाव, मोहरी, तनपूरवाडी, वाळुंज देवी, दौलताबाद, वेरूळ, अजंठा इत्यादी ठिकाणी गेलेल्या सहली चांगल्या स्मरणात आहेत. आठवी ते दहावी टेक्निकल घेतल्यानं नवीन शाळेत आलो. नागरगोजे सर आणि नंतर भोसे सर मुख्याध्यापक होते. मराठी ला कोठारी सर व गायकवाड बाई, इतिहास शिवरामभाऊ खेडकर सर, संस्कृत भोसे सर व वनारसे सर, गणित मोठे उरणकर सर, भूमितीचे V K देशमुख सर, जीवशास्त्र रमेश बाहेती सर, रसायनशास्त्र सुराणा सर, भौतिक शास्त्र विरगावकर सर, इंग्रजी मेघुंडे सर, हिंदी भोसे बाई आणि इतर शिक्षक वर्ग दीपक कुलट सर , कोळेकर सर, छोटे उरणकर सर, मोठे उरणकर सर , टेक्निकल ला थोरात सर, सुतार सर, वाकलकर सर, जवणे सर, दत्ता कुलकर्णी सर, साठे सर, ग्रंथपाल T M खेडकर सर, PT चे भडके सर या सर्व शिक्षकांनी खूप माया लावली. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, गीता जयंती अशा अनेक वक्तृत्व, कला स्पर्धेत भाग घेत पारितोषिके मिळवली. पद्मभूषण मोदी यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आनंद ऋषी महाराजांचे चातुर्मास अटेंड केले. सर्वांगाने व्यक्तिमत्त्व विकास श्री तिलोक शाळेत झाला आणि 1984 साली SSC परीक्षेत मी व शुभांगी तरटे पाथर्डी तालुक्यात 85% गुण मिळवून पहिले आलो. त्यामुळे 11 विला पुण्यातील स. प. महाविद्यालयात शास्त्र शाखेत प्रवेश घेण्याचा मार्ग सुकर झाला. नंतर 1990 साली पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून BE सिव्हिल इंजिनिअरिंग केले व 1995 साली UPSC च्या Civil services examination मधून भारतीय पोलीस सेवेत IPS साठी निवड झाली. सध्या मी हैद्राबादला पूर्व भागातील राचकोंडा पोलीस कमिशनरेटचा पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे. नुकतेच अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर प्रमोशन झाले आहे. आयुष्यात ऐन उमेदीच्या काळात भक्कम पायाभरणी करण्यासाठी श्री तिलोक जैन विद्यालयाचे फार मोठे उपकार आहेत. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नक्कीच प्रयत्न राहील. संस्थेचे सचिव सतिशजी गुगळे आणि सर्व पदाधिकारी व शाळेतील प्राचार्य अशोक दौंड आणि सर्व गुरुजनांना आदरपूर्वक नमस्कार
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.