श्री तिलोक जैन विद्यालयात प्राथमिक विभागांमध्ये इ. ५ वी ते इ. ८ वी पर्यंतच्या
वर्गाचे प्रत्येकी ५ तुकड्या कार्यरत आहेत. प्रत्येक वर्गाच्या ४ तुकडी सेमी इंग्रजी माध्यमातून
व १ तुकडी मराठी माध्यमातून विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतात. प्रत्येक वर्गाची १ सेमी
माध्यमाची तुकडी ही Digital Classroom आहे. काही दिवसातच सर्व वर्ग Digital
Classroom करण्याचा संस्थेचा मानस आहे. विद्यालयात 24 संगणकांची स्वतंत्र लॅब असून
सर्व विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण दिले जाते .
इ.५ वी व इ. ८ वीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्तीचे तास घेतले जातात . शिष्यवृत्ती
परीक्षेचा प्रत्येक वर्षी चांगला रिझल्ट मिळतो. याबरोबरच इ. ५ वी नवोदय प्रवेश परीक्षा,
सी. व्ही रमन बालवैज्ञानिक परीक्षा, गणित व विज्ञान अध्यापक मंडळाच्या प्रश्नमंजुषा,
इलेमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा तसेच इंग्रजी, गणित, विज्ञान विषयाच्या अवांतर
परीक्षा घेतल्या जातात.
विद्यालयात आनंद जयंती,सावित्रीबाई फुले जयंती, जिजाऊ जयंती, डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, शिवजयंती यासारखे महापुरुषांच्या
जयंती कार्यक्रम उत्साहाने साजऱ्या केल्या जातात. तसेच गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी
कार्यक्रम घेतला जातो. जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने आनंद
मेळाव्याचे नियोजन दरवर्षी केले जाते. विविध विषय दिन वेगवेगळ्या प्रकाराने साजरे केले
जातात; तसेच ध्यानधारणा शिबिराचे आयोजन केले जाते. जानेवारी महिन्यामध्ये इंग्रजी
सप्ताहाचे नियोजन केले जाते यामध्ये इ. ५ वी ते इ. ८ वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने
सहभागी होतात. यामध्ये Speech, ebeat, Poem recitation,one act play, short plays
अशा activities घेतल्या जातात. विद्यार्थी स्वतः कार्यक्रमाचे नियोजन करून सूत्रसंचालन ते
आभार प्रदर्शनापर्यंत पूर्ण कार्यक्रम इंग्रजी भाषेतून पार पाडतात.
विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थी नेहमीच अग्रेसर असतात. सर्व क्रीडा शिक्षक
विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे मार्गदर्शन करतात ;तसेच बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभागी
होण्यासाठीही विद्यालयात मार्गदर्शन केले जाते.
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.