एन. सी. सी. विभाग


      विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. या हेतूने राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एन.सी.सी. ची १९६२ मध्ये 17 MAH  BN  NCC A.Nagar या बटालियन कडून विद्यालयास एन. सी .सी. चे युनिट देण्यात आले.
         एन. सी. सी. ने ठरवलेली उद्दिष्टे काळाच्या कसोटीवर उतरले आहेत;आणि देशातील सध्याच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीत एन.सी.सी कडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करत आहेत. तरुणांमध्ये चारित्र्य, मैत्रीची भावना, शिस्त ,धर्म निरपेक्ष दृष्टीकोन साहसीवृत्ती आणि नि:स्वार्थी सेवेचा आदर्श विकसित करण्याचे एन.सी.सी.चे उद्दिष्ट आहे. याशिवाय जीवनातील सर्व क्षेत्रात नेतृत्वगुण असलेला संघटित प्रशिक्षित आणि प्रेरित युवकांचा स्रोत निर्माण करणे एन.सी.सी.चे ध्येय आहे. युवकांचा स्रोत त्यांनी निवडलेल्या व्यवसायाकडे लक्ष न देता देशाची सेवा करेल. तरुण भारतीयांना सशस्त्र सेनादलात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे पोषक वातावरण एन.सी.सी उपलब्ध करून देते.
    प्रत्येक वर्षी एन.सी.सी.चे  देशभर कॅम्प होतात.
1) Annual Training Camps
2) National Integration Camps
3) Republic Day Camps
4) National Tracking Camps
5) Thal Sena Camps

 या सर्व कॅम्पसमध्ये आपल्या कॅडेट्सने  यश मिळविले आहे .
1) दिल्ली येथील आर.डी.सी. कॅम्पस मध्ये खेडकर भानुदास प्रभाकर या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक संचलनासाठी निवड झाली होती.

2) दिल्ली येथील स्थलसेना  कॅम्पस मध्ये कुमारी गायकवाड ऋतुजा बापूराव या कॅडेट्स ची स्थलसेना कॅम्पस मधून दिल्ली येथे निवड झाली. तिने रायफल फायरिंग मध्ये 50 पैकी 50 गुण मिळवून महाराष्ट्र राज्याचा झेंडा फडकविला.




Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.