लॉर्ड बेडन पॉवेल यांनी भारतामध्ये 1913 मध्ये स्काऊटची स्थापना केली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 7 नोव्हेंबर 1950 रोजी भारत स्काऊट आणि गाईड ही संस्था
अस्तित्वात आली.
स्काऊट गाईड चळवळीचा उद्देश
स्काऊट व गाईड चळवळीमधून मुलांना धर्मनिरपेक्ष, भेदभावरहित शिक्षण
दिले जाते. मानवतेच्या स्थापनेसाठी नि:स्वार्थ सेवा करणे, विश्वबंधुत्व वाढविणे,
सक्षम बनविण्याबरोबरच उत्तम नागरिकत्व, स्वयंशिस्त, देशभक्ती याबाबत
संस्कारित करण्याचे काम केले जाते.
श्री तिलोक जैन विद्यालयांमध्ये 1972 पासून स्काऊट व गाईड हे युनिट
चालू आहे. आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी स्काऊट व गाईडचे शिक्षण घेऊन आपले जीवन
समृद्ध केले आहे. विद्यालयाचे नाव लौकिक वाढविण्यासाठी या चळवळीत भाग
घेतला. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी आत्तापर्यंत अनेक उपक्रम विद्यालयात
राबविण्यात आलेले आहेत.
राज्य पुरस्कार प्राप्त पैकी दोन मुलींना कुमारी श्रेया सतिश गुगळे व
प्राजक्ता सुभाष खेडकर यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कृत केलेले आहे. या
गुणगौरव कार्यक्रमास राज्यपाल, पालकमंत्री, शिक्षणाधिकारी, राज्य आयुक्त
उपस्थित होते.
दरवर्षी विद्यालयात वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. खरी कमाई,
पर्यावरणीय उपक्रम, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, पल्स पोलिओ
लसीकरण, निसर्ग भेट, शिबिर तसेच जिल्हा मेळावे व राज्य मिळावे यात
सहभाग नोंदविला आहे .सर्व उपक्रम विद्यालयांमध्ये राबवले जातात.
सध्या विद्यालयात स्काऊट गाईड युनिट मध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षिका
श्रीमती मिसाळ एम.जे. श्रीमती रेदासणी एस. आर. श्रीमती मोरे एम.जी.
श्रीमती भोसे ए. व्ही. श्रीमती इंगळे व्ही आर. या महिला शिक्षिका कामकाज
पाहत आहेत.