Testimonials



प्रो. के.पी. सोनवणे

(माजी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.) Alumnus 1952-1956

आचार्य सम्राट श्री आंनदऋषीजी यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या श्री तिलोक जैन विद्यालयात मी 1952 ते 1956 साली होतो.ब्रिटिश काळात माध्यमिक शिक्षण देणारी ही तालुक्यातील एकमेव शाळा. सातवी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी मी पाथर्डीला आलो आणि वि. र. बडे वकील यांच्यामुळे हिंद वसतिगृहात राहण्याची सोय झाली. त्यावेळी प.पू. मेहेंदळे मुख्याध्यापक होते. "जसा मुख्याध्यापक तशी शाळा " या उक्तीप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पध्दतीचे शिक्षण या विद्यालयातून मला मिळाले. त्याकाळी थोर स्वा. सेनानी रावसाहेब पटवर्धन ,बाळासाहेब भारदे , कवी यशवंत या सारख्या मान्यवरांच्या भाषणातून आम्हाला प्रेरणा मिळत असे. मेहेंदळे सर रेडिओ वर प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकवत असत. परिसर सहल आणि श्रमदान हे आमच्या साठी पर्वणीच असायची. परीक्षाचे पेपर ऐनवेळी जाहीर केले जात असल्याने वस्तुनिष्ठ मूल्यमापन होत असे. या माझ्या शाळेने अनेक डॉक्टर , वकील ,राजकारणी ,इंजिनिअर ,शिक्षण तज्ञ आणि अनेक प्रशासनातील अधिकारी दिले. श्री तिलोक जैन विदयालयामुळेच मी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी विराजमान होऊ शकलो, माझ्या जडणघडणीचा पाया या शाळेत रचला गेला याचा मला अभिमान वाटतो. विद्यालयाच्या विकासाला खूप खूप शुभेच्छा.....

Back to Testimonials

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.