शाळासिद्धी ( समृध्दशाळा )


WELCOME TO Shri Tilok Jain Secondary and Higher Secondary Vidyalaya,

      राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ (NUEPA) हे मनुष्यबळ विकास मंत्रालय (MHRD) यांच्या आश्रयाने शाळा मानके व मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम (NPSSE) चे नेतृत्व करीत आहे . NPSSE हा असा उपक्रम आहे ज्याचे ध्येय हे प्रत्येक शाळेचे एक संस्थान म्हणून मूल्यांकन करणे आणि जबाबदारीने स्व-विकासाची संस्कृती विकसित करणे आहे. शाळा मानके व मूल्यांकन आराखडा (SSEF ) हे शाळा मूल्यांकनाचे समावेशक साधन म्हणून विकसित करण्यात आले आहे.हा आराखडा शाळांना सुयोग्य पद्धतीने,निर्धारित निकषांवर,त्यांच्या निर्णायक कामगिरी क्षेत्रांचे मूल्यमापन केंद्रित व धोरणात्मक पद्धतीने करण्यास सक्षम बनवितो.

    वेब पोर्टल द्वारा प्रत्येक शाळेस आपला स्वयं-मूल्यमापन अहवाल ऑनलाइन सादर करावा लागतो.त्या अनुषंगाने विद्यालयाने ऑनलाइन माहिती भरून प्रत्येक क्षेत्रे व त्यांची गाभा मानके याबद्दल योग्य मूल्यांकन केले. त्यात स्वयंमूल्यांकनाची मार्गदर्शक मुद्दे,त्यांची पूर्व तयारी,पुराव्यांचे संकलन,सुधारणा करण्यासाठी बलस्थाने आणि संधींचा शोध घेतला. यात विद्यालयाने २०१८ -१९ मध्ये १३८ पैकी १३० गुण मिळवून प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० साठी विद्यालयाने वर्षभरातील विकास व सुधारणा या आधारे शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापनात १३८ पैकी १३२ गुण मिळवून प्रथम श्रेणी प्राप्त केली.

    १) श्रीम. शेख टी.एम.
    २) श्री.ताठे जी.एस.
    ३) घोशीर यू.जी.
    ४) साबळे एस.ए.

Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.