मी भक्ती विलास बाहेती, श्री तिलोक जैन विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत (२००१-२००७) विद्यार्थिनी होते. माझे वडील, तीन मोठ्या बहिणी सर्व याच शाळेत शिकले. सध्या मी इलेक्ट्रॉनिक्स विषयात PhD पूर्ण केली असून विद्यापीठात शोधनिबंध सादर केला आहे. आज आणि भविष्यात मी जे काही मिळवले आहे त्यात या शाळेचा अमूल्य वाटा आहे हे मी अभिमानाने सांगते. दहावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे ११ वी ला पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यानंतर २०१३ मध्ये पुण्यातील PICT कॉलेज मधून इंजिनीअरिंग आणि २०१५ मध्ये SGGS नांदेड येथून पदव्युत्तर शिक्षण M.Tech पूर्ण केले आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयात PhD संशोधनास सुरुवात केली. PhD मध्ये विविध प्रतिष्ठित journals आणि conferences मध्ये माझे शोध निबंध प्रकाशित झाले तसेच विविध travel grant आणि fellowship ची मी मानकरी ठरले. मागील वर्षी माझ्या प्रस्तुत algorithm ने India Driving Dataset Segmentation Challenge या अखिलभारतीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. नुकतेच Women in Computer Vision या अमेरिकेच्या वर्कशॉप मध्ये माझी निवड झाली. PhD नंतरही याच विषयामध्ये संशोधन सुरु ठेवायचा माझा मानस आहे. आयुष्यात पुढे जातांना नेहमीच श्री तिलोक जैन विद्यालयाने केलेल्या मजबूत पायाभरणीचे महत्त्व प्रकर्षाने जाणवत राहिले. मी या शाळेची आणि सर्व गुरुजनांची सदैव ऋणी राहील. आजही शाळेच्या आणि गुरुजनांच्या आठवणी स्मरणात आहेत आणि त्यांच्यासाठी नेहमीच आदर, आपुलकी आणि कृतज्ञता माझ्या मनात राहील
Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.