About School



    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून स्वर्गीय ज्ञानरत्नाकर, शिक्षाप्रेमी, पूज्यपाद श्री रत्नऋषिजी म.सा साहेब यांचे सत्प्रेरणेने व स्व. श्री. मोतीलालजी गुगळे , स्व. श्री. उत्तमचंदजी मुथ्था , स्व. श्री. मगनमलजी गांधी यांचे पुढाकाराने ३ जून १९२३ रोजी श्री तिलोक जैन विद्यालयाची स्थापना झाली . गोरगरीब , गरजू मुलांना शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने सुरु झालेले हे विद्यालय आजही निरंतरपणे आपल्या उद्दिष्टावर वाटचाल करीत आहे . केवळ ९ विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या या विद्यालयात आज हजारो विद्यार्थी ज्ञानग्रहण करीत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या शाळेच्या विकासामध्ये प. पू. राष्ट्रसंत १००८ श्री आनंदऋषिजी म. सा . यांचे कृपाशीर्वाद , मौलिक मार्गदर्शन लाभलेले आहे . या विद्यालयाचे प्रथम मुख्याध्यापक श्री गोविंदराव सिताराम वराडे हे अतिशय त्यागी , विद्वान शिक्षक होते . सर्व विषय तेच शिकवीत तसेच धार्मिक शिक्षणही देत . केवळ ९ विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या शाळेची विद्यार्थी संख्या ७ महिन्यांतच ३५ झाली. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कै. कुंदनमलजी फिरोदिया यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली . शाळेचे कामकाज पाहून खूप प्रसन्नता व्यक्त केली. लवकरच विद्यार्थी संख्या ६३ वर गेली .

    ३० / ०४ / १९२७ रोजी शाळेची विद्यार्थी संख्या १२८ वर गेली . नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षकांची संख्या ७ वर गेली. मराठी बालवर्गापासून ७वी पर्यंत इंग्रजी शिकविण्यात येवू लागले. शिवाय जिल्हा लोकल बोर्डामार्फत चालविले जाणारे इ. १ ली ते इ. ४ थी पर्यंतचे वर्ग सुरु केले . राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्ध्याचा हिंदी परीक्षांचा अभ्यास शिकविण्यात येवू लागला . बालवाचनालय, जैन धार्मिक परीक्षा बोर्ड पाथर्डी अभ्यासक्रम आदी उपक्रम सुरु झाले. परीक्षांचे निकाल समाधानकारक येवू लागले. कै . कुंदनमलजी फिरोदिया , उत्तमचंदजी बोगावत , सोसायटी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शंकरराव नवाथे, किसनदासजी मुथ्था इ. तज्ञ मंडळी वार्षिक परीक्षा घेत. शिक्षण खात्यातील ज्येष्ठ अधिकारी शाळेला भेट देत असत व समाधानकारक असा शेरा देत असत. अशा प्रकारे शाळेची भरभराट होऊ लागली . read more...

Secretaries Desk

Shri SATISHJI GUGALE

Secretary

(B.Com.)


|| इवलेसे रोप लावियले द्वारी,
त्याचा वेलू गेला गगनावरी ||

या ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे ९७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री जैन ज्ञान फंड या नावाने स्थापित पाठशाळेचे आज श्री तिलोक जैन विद्यालयात रुपांतर झाले असून हे विद्यालय शताब्दीकडे वाटचाल करीत आहे याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे . श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय हे केवळ नगर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक नामवंत शैक्षणिक संकुल म्हणून नावारुपास आलेले आहे . शैक्षणिक संकुल हे केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक संकुल असते. उत्तम नागरिक तयार करून तो समाज प्रवाहात सोडण्याचा एक महत्त्वाचा स्त्रोत असते . देशातील समाजाची जडणघडण या स्त्रोताच्या शुचितेवर अवलंबून असते .

Read More

Principals Desk

Shri AJAY BHANDARI

Principal

(B.Sc, B.P.Ed, DSM)


    श्री तिलोक जैन विद्यालय ही शतकपूर्ती केलेली महाराष्ट्रातील एक नामांकित शाळा म्हणून गणली जाते. सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने सुरू झालेली ही शाळा आजही निरंतर आपल्या उद्दिष्टावर कार्यरत आहे . एक सुजाण नागरिक म्हणून उच्च ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थी या संकुलात प्रवेश घेतात . या शाळेत विविध विभागाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो . या विद्यालयांमध्ये एन .सी .सी . , स्काऊट , गर्ल गाईड , व्यावसायिक शिक्षण , भारत सरकार पुरस्कृत बी .आय . एस .क्लब ची निर्मिती , ग्रीन क्लब , विविध पर्यावरण पूरक उपक्रम इ. प्रकारचेअसंख्य उपक्रम राबवले जातात.उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेचा लौकिक आहे . विद्यालयातील शिक्षकांमध्ये असणारी अथक कष्ट करण्याची तयारी , वेळेचे अचूक नियोजन , प्रत्येकाशी असणारे सलोख्याचे संबंध,

Read More

Photo Gallery






×
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12

Video Gallery






News Board

Media Coverage



Testimonials

श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ




We Have Something To Be Proudof


  • 31000+

    Alumni of Shri Tilok Jain
    Vidyalaya

  • 5000+

    Models Presented
    in Science Exibition

  • 3000+

    Students Pass out
    Every Year

  • 500+

    Students get Success
    in Competative Exam

  • 100+

    Activities Carried out
    Every Year

  • 50+

    Educational Training
    Camps Every Year



Copyright © 2020 Shri Tilok Jain Secondary & Higher Secondary Vidyalaya, Pathardi || Developed by Prasad Thorat.